बायकोच्या नाकावर टिच्चून प्रेयसीला घरच्या बेडरुममध्ये न्यायचा..शेवटी बायकोचे ‘ धक्कादायक ‘ पाऊल ?

शेअर करा

लग्नानंतर काही वर्षातच पतीचे पाऊल वाकडे पडलेले पाहून पत्नीने त्याला वेळोवेळो समजावून पाहिले मात्र त्याच्यात काही बदल होत नव्हता. बायकोत आणि त्याच्यात भांडणे होऊ लागताच पुढे पुढे तो बायकोच्या नाकावर टिच्चून प्रेयसीला घरी आणायला लागला. सासरच्या मंडळींनी देखील अशा वेळी तिचाच छळ केला. अखेर ह्या त्रासाला वैतागून तिने विष पिऊन आत्महत्या केली. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना नागपूर इथे घडली असून अश्विनी प्रवीण घुग्गुसकर असे ह्या दुर्दैवी पत्नीचे नाव आहे . हुडकेश्वर पोलिसांत या प्रकरणाची तक्रार करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

उपलब्ध माहितीनुसार, 2016 मध्ये अश्विनीचा प्रवीण घुग्गुसकर याच्याशी विवाह झाला. राजा-राणीचा सुखाचा संसार सुरू असताना त्यांना एक मुलगाही झाला मात्र काही कालावधीनंतर एका महिलेची प्रवीणच्या आयुष्यात एंट्री झाली आणि त्यानंतर अश्विनीचा छळ सुरू झाला. विवाहबाह्य संबंधातून प्रवीणकडून तिला रोज मारहाण करण्यात येत असल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात समोर आले आहे.

प्रेयसीच्या नादाला लागून प्रवीण पूर्ण पागल झालेला होता . ‘माझं एका युवतीवर प्रेम आहे, तिच्यासोबतच मला लग्न करायचं आहे. त्यामुळे तू मुलाला घेऊन निघून जा ‘ अशी धमकी देत तो तिला मारहाण करत असे. धक्कादायक बाब म्हणजे प्रवीणला समजावून सांगणे तर दूरच, प्रवीणच्या घरच्यांनी देखील याकामी त्याचीच साथ दिली आणि सासू आणि सासर्यांनी देखील मयत अश्विनी हिलाच मारहाण केली .

आई वडिलांची भक्कम साथ आणि हतबल झालेली बायको पाहून पतीला आणखीनच माज आला . बायकोच्या नाकावर टिच्चून तो प्रेयसीला घरी आणायला लागला. बायको घरात असताना देखील तिला बाहेर ठेऊन प्रवीण बेडरूममध्ये तासंतास प्रेयसीसोबत राहायचा . यातून बायकोची मानसिक स्थिती ढासळत गेली आणि अखेर तिने विष पिऊन आत्महत्या केली.

२० ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना घडली होती. विष पिल्यानंतर अश्विनी हिला दवाखान्यात नेण्यात आले होते मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. अश्विनीचे कोणीच ऐकत नसल्याचे पाहून प्रवीणची प्रेयसी देखील तिला धमकावू लागल्याची माहिती पुढे आली आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी पति प्रवीण घुग्गुसकर (32), सासू लीलाबाई घुग्गुसकर (60), सासरा लक्ष्मण घुग्गुसकर (65) आणि नणंद अशिनी कालबांडे (36) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे


शेअर करा