जप्तीतल्या नोटा आहेत डबल करून देतो , सरपंचानी मुंबई फिरवली अन ..

शेअर करा

सध्या महाराष्ट्रातील एक प्रकरण जोरदार चर्चेत आलेले असून बुलढाणा जिल्ह्यात आयकर विभागाचे अधिकारी आहोत असे सांगत कारवाईत 40 लाख रुपये आलेले आहेत ते तुम्ही घ्या आणि आम्हाला फक्त वीस लाख रुपये द्या असा बनाव करत पुण्यातील एका व्यक्तीची मुंबईत फसवणूक करण्यात आलेली आहे . सदर प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चितोडा अंबिकापुर येथील सरपंच असलेल्या एका व्यक्तीसह तीन जणांना माटुंगा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सदर प्रकरणातील मुख्य आरोपी सरपंच असलेला देवराव भाऊराव हिवराळे याच्या विरोधात अशाच स्वरूपाचे इतरही गुन्हे दाखल आहेत. तक्रारदार असलेले रामदास दत्तात्रय बल्लाळ यांना दोन व्यक्तींनी आपण आयकर विभागाचे अधिकारी आहोत. आमच्याकडे जप्त केलेले 40 लाख रुपये आहे. नोटा बदलून घेण्यासाठी तुम्ही फक्त वीस लाख रुपये द्या आणि 40 लाख रुपये परत घ्या असे आमिष दाखवले होते.

सदर प्रकरणी आरोपी यांनी बल्लाळ यांची पुण्यात पुणे आणि मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी भेट देखील घेतली होती त्या वेळी त्यांनी बल्लाळ यांना आलिशान गाडीतून मुंबई फिरवून लागली. त्यांचा विश्वास संपादन झाल्यानंतर वीस लाख रुपये रोख घेण्यात आले आणि त्याच्या बदल्यात त्यांना नकली नोटा देण्यात आल्या . हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली त्यावरून देवराव भाऊराव हिवराळे ( वय 35 ) , रविकांत जनार्धन हिवराळे ( वय 36 ) योगेश वासुदेव हिवराळे यांना अटक केली आहे.


शेअर करा