बागेश्वरबाबाच्या पाठीमागे आता ‘ जादूगार ‘ , दिव्यशक्ती होऊन जाऊ द्या

शेअर करा

बागेश्वरधाम येथील बाबा धीरेंद्र शास्त्री सध्या चांगलाच चर्चेत आलेला असून आपण लोकांच्या मनातील ओळखू शकतो असे सांगत नागपूर येथे त्याने दिव्यशक्ती आणि प्रेत दरबार आयोजित केलेला होता मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिल्यानंतर हा बाबा तेथून फरार होऊन इतर राज्यात गेलेला होता त्यानंतर बाबा बाबत जोरदार चर्चा सुरू झाली असताना चक्क एका जादूगाराने देखील त्यास आव्हान दिलेले आहे.

बागेश्वरबाबा मनातले ओळखत असल्यामुळे आपल्याला आपल्यावर देवाची कृपा आहे असे तो सांगतो मात्र मनातलं ओळखण ही एक कला आहे असं सांगत माईंड रीडर सुहानी शाह ही देखील चांगलीच चर्चेत आलेली आहे त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रसिद्ध जादूगार शिवकुमार यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री या महाराजाला आव्हान दिलेले असून जगात कुठेही दिव्यशक्ती नाही तर जादू ही एक विद्या आहे. जादू ही अलौकिक किंवा काही चमत्कार नसून विज्ञान कलेचे एक रूप आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही ते दाखवून देतो त्यालाच लोक जादू समजतात असे म्हणत या बाबाला त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हान दिलेले आहे.

शिवकुमार यांनी म्हटले आहे की, ‘ मेडिटेशन योगा आणि बहुरंगी कला या सर्वांचा समावेश जादूच्या कलेत आहे. अलवर येथे जादूगारांच्या समोर येऊन तुम्ही तुमची दिव्यशक्ती किंवा अलौकिक शक्ती दाखवा आणि सिद्ध करा. जर तुम्ही तसे केले तर सर्व जादूगार तुमच्या आश्रमात सेवा देतील असे चॅलेंज शिवकुमार यांनी या बाबाला केलेले आहे.


शेअर करा