नगर चौफेर एक्सक्लुजिव्ह : 10 ऑक्टोबर रोजी मंत्रालयात नक्की काय घडलं ?

शेअर करा

नगर शहरातून गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतील मंत्रालयापर्यंत पायी लॉंग मार्च काढणारे अहमदनगर महापालिकेचे कर्मचारी आणि सफाई कामगार यांचा लॉंग मार्च सुमारे वीस किलोमीटर पर्यंत चालल्यानंतर त्यांना 10 ऑक्टोबर रोजी मंत्रालयात बैठकीचे लेखी पत्र देण्यात आले मात्र ही बैठक काही कारणाने पार पडली नाही . महापालिका कामगार युनियनचे पदाधिकारी बैठकीसाठी मुंबईला मंत्रालयापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर राज्य सरकारच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांसोबत तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला होता. महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी नगर चौफेर प्रतिनिधीला घडलेल्या घटनाक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे

अनंत लोखंडे म्हणाले की , ‘ महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी तसेच सफाई कामगारांच्या वारसा हक्कांच्या नियुक्ती बाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेली बैठक तहकूब करण्यात आली मात्र ही बैठक येत्या काही दिवसात होणार असून सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचलेला असून लवकरच यावर निर्णय होणार आहे ‘, असे आश्वासन युनियनला देण्यात आलेले आहे.

अनंत लोखंडे पुढे म्हणाले की , ‘ मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली त्यावेळी हा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचलेला आहे. माझी आणि मुख्यमंत्री यांची चर्चा झालेली आहे लवकरच सातवा वेतन आयोग मंजूर होईल ‘, असे पवार यांनी आम्हाला सांगितलेले असून लाड पागे समितीच्या नियुक्तीबाबतचा विषय हा केवळ नगर महापालिकेचा नसून संपूर्ण राज्याचा विषय आहे याबाबत मुख्यमंत्री स्वतः लवकरच बैठक घेणार आहेत , ‘ असे देखील ते पुढे म्हणाले.


शेअर करा