
गेल्या काही तारखांना न्यायालयात गैरहजर राहणारे इंदुरीकर महाराज हे गुरुवारी 23 तारखेला अखेर न्यायालयात हजर झाले आणि त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला . सम विषम तारखेवरून अपत्यप्राप्तीबद्दल वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मात्र सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले आणि त्यानंतर देखील इंदुरीकर महाराज यांना दिलासा मिळाला नाही म्हणून सध्या ही केस कोर्टात सुरू आहे.
इंदुरीकर महाराज यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एडवोकेट रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार केली त्यानंतर 19 जून 2020 रोजी इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला . सर्वोच्च न्यायालयाने देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर संगमनेर न्यायालयात ही केस सध्या सुरू आहे.
इंदुरीकर महाराज यांना न्यायालयाने समन्स पाठवून हजर राहण्यास सांगितले होते मात्र ते हजर राहिले नाही म्हणून त्यांना पुन्हा वेळ देण्यात आली त्यानंतर अखेर 24 नोव्हेंबर तारीख सुनावणीसाठी देण्यात आलेली होती मात्र त्या तारखेला जर हजर राहिले नाही तर वॉरंट निघण्याची शक्यता असल्याकारणाने इंदुरीकर महाराज 23 तारखेला अचानक न्यायालयात हजर झाले होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस एम वाघमारे यांच्यासमोर जामीनासाठी अर्ज करण्यात आला त्यानंतर 20 हजार रुपयांचा जमीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे.