‘ तुम्हारी थैली वो लेके गया ‘, पाथर्डीत महिलेला अनोख्या पद्धतीनं लुबाडलं 

शेअर करा

नगर जिल्ह्यात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून पाथर्डीत ‘ तुमच्या पतीचे कोर्टात तीस हजार रुपये आलेले आहेत ते काढण्यासाठी तुमचा फोटो हवा आहे ‘ असा बनाव करत एका महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने पाथर्डी न्यायालयाजवळून गायब करण्यात आलेले आहेत . बुधवारी सात तारखेला हा प्रकार घडला असून महिलेने त्यानंतर पाथर्डी पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , खमरुनिसा बशीर बागवान ( वय 65 राहणार नाथ नगर पाथर्डी ) असे फिर्यादी महिला यांचे नाव असून पाथर्डीत बाजार तळावर खरेदी सुरू असताना एक अनोळखी इसम तिथे आला आणि त्याने तुम्ही ईर्षादची आई आहात ना ? असे म्हणत ओळख पटवत त्यांच्याशी बोलण्यास सुरू केले. 

आरोपी व्यक्तीने त्यानंतर तुमच्या पतीच्या नावाने ‘ तीस हजार रुपये कोर्टात आलेले आहेत. त्याच्यासाठी तुमचा फोटो गरजेचा आहे तुम्ही कोर्टात चला ‘ असे म्हणत बागवान यांना रिक्षात बसवून कोर्टासमोर आणले . आरोपीने त्यानंतर फोटो काढण्याआधी तुमच्या गळ्यातील सोन्या-चांदीचे दागिने एका पिशवीत ठेवा असे सांगितले आणि त्यानंतर ही पिशवी त्यांनी स्टुडिओत ठेवली आणि त्या व्यक्तीबरोबर कोर्टात गेल्या. 

कोर्टात काहीतरी बहाना बनवत आरोपी त्यांना पुन्हा चकमा देण्यास यशस्वी झाला आणि तिथून निघून गेला . फिर्यादी महिला ज्यावेळी फोटो स्टुडिओत गेल्या त्यावेळी तुमच्याबरोबर आलेला माणूस बाजाराची पिशवी घेऊन गेलेला आहे असे त्यांना सांगण्यात आले .आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच त्यांनी पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे. 


शेअर करा