माझ्या फार ओळखी ऑर्डर मिळवून देतो , सही शिक्के अन ऑर्डरही दाखवली पण.. 

शेअर करा

फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार पुण्यात समोर आलेला असून नामांकित कंपनीमध्ये तुम्हाला मशीनची ऑर्डर मिळून देतो असे आमिष दाखवत बारामती येथील एका व्यावसायिकाला तब्बल 39 लाख 83 हजार रुपयांना चुना लावण्यात आलेला आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी त्यानंतर आरोपीला कर्नाटक येथील कलबुर्गी इथून ताब्यात घेतलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , गणेश दामोदर पवार ( वय 40 वर्ष राहणार भिगवन रस्ता बारामती ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून प्रसाद चंद्रकांत दिवाकर ( राहणार कोथरूड ) यांनी त्याच्या विरोधात फिर्याद दिली होती . 

फिर्यादी व्यक्ती असलेले प्रसाद दिवाकर यांचा बांधकाम व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरी आणि दुरुस्तीचा पार्टनरशिपमध्ये व्यवसाय आहे. आरोपी गणेश पवार याने फिर्यादी व्यक्ती यांच्याकडून रस्ता तयार करण्यासाठी लागणारा मिनी कॉम्पॅक्टर घेतला आणि त्याचे पैसे देऊन विश्वास संपादन केलेला होता. 

आरोपीने त्यानंतर मोठी ऑर्डर मिळणार आहे असे भासवत बनावट सही शिक्के असलेली ऑर्डर दाखवली आणि ऑर्डर देण्यासाठी नऊ लाख 83 हजार रुपये फिर्यादी यांच्याकडून उकळले. गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेश पवार हा फरार झालेला होता मात्र पोलिसानी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याला कर्नाटकातील कलबुर्गी इथून ताब्यात घेतले आहे . 


शेअर करा