नगरमध्ये कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून नगर तालुक्यातील कौडगाव येथील पोस्ट ऑफिसमध्ये गुरुवारी सहा तारखेला किरकोळ कारणावरून पोस्टमास्तरला मारहाण करत सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रकार घडलेला आहे. नगर तालुका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सत्यम अशोक दहिफळे ( वय तीस वर्ष राहणार मोहटा तालुका पाथर्डी सध्या राहणार सिव्हिल हडको नगर ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून अनिकेत राजेंद्र ठोंबे ( राहणार खांडके तालुका नगर ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
फिर्यादी व्यक्ती गुरुवारी पोस्ट ऑफिसमध्ये काम करत असताना अनिकेत ठोंबे तिथे आला आणि खात्यातील शिल्लक रक्कम रक्कम विचारली. आत्ताचे आत्ता मला रक्कम सांगा असे म्हणत तो घाई करू लागला त्यावर फिर्यादी यांनी त्यास कृपया रांगेत काही लोक आहेत तुम्ही रांगेत या असे म्हटले त्याचा आरोपीला राग आला आणि त्याने फिर्यादीस मारहाण केली . फिर्यादी यांनी अखेर नगर तालुका पोलिसात त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.