
देशाची शरमेने मान खाली जाईल अशी एक घटना अमेरिकेत समोर आलेली असून भारतीय वंशाच्या एका व्यक्तीने चक्क अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांना यांची हत्या करण्याचा हत्या करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचे निवासस्थान असलेल्या सुरक्षा बॅरिकेडवर एका व्यक्तीने जाणीवपूर्वक ट्रक धडकवला. जो बायडन यांची हत्या करून सत्ता काबीज करण्यासाठी आपण हा प्रयत्न केलेला होता असे त्याने पोलिसात सांगितलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, साई वशिष्ठ कांडुला ( वय 19 ) असे आरोपी युवकाचे नाव असून सोमवारी रात्री दहाच्या सुमारास त्याने एक ट्रक बॅरिगेडवर नेऊन आदळला होता त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सुरुवातीला पोलिसांना हा अपघात वाटला मात्र त्याने पुन्हा गाडी पाठीमागे घेऊन पुन्हा एकदा बॅरिकेडवर गाडी धडकवली त्यामुळे तात्काळ अमेरिकन पोलीस सक्रिय झाले आणि आरोपीला अटक करण्यात आली. तो अमेरिकेचा नागरिक नसून त्याला फक्त ग्रीन कार्ड देण्यात आलेले आहे .
त्याला तेथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी त्याने आपण व्हाईट हाऊसमध्ये घुसून सत्ता हस्तगत करणार होतो असे म्हटलेले आहे . अशाप्रकारे कशी सत्ता हस्तगत केली जाऊ शकते असे त्याला विचारण्यात आले त्यावेळी त्याने आपल्या उद्देशपूर्तीच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाची आणि अक्षरशः अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची देखील हत्या करण्याची आपली योजना होती असे म्हटलेले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आपण यासाठी तयारी करत होतो असे देखील त्याने म्हटलेले आहे.
त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची आणि त्याच्या गाडीची झडती घेतली त्यावेळी गाडीमध्ये हिटलरच्या नाझीचा झेंडा आढळून आलेला असून जर्मनीचा हुकूमशाही हिटलर हा आपला आदर्श होता असे देखील त्याने म्हटलेले आहे . घटनेत त्याने वापरलेला ट्रक देखील त्याने भाड्याने घेतलेला असून सध्या तो पोलिसांच्या कोठडीत आहे . साई याचे भारतातील नातेवाईक तसेच अमेरिकेतील नातेवाईक कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे का ? याचा सध्या पोलीस तपास करत आहेत .