अवघ्या 19 व्या वर्षी इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस , कारनामे असे की..

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका चोराची जोरदार चर्चा सुरू असून विशेष म्हणजे या चोराचे वय अवघे 19 वर्ष आहे . त्याचा निरागस चेहरा पाहिला तर कुणालाही त्याच्या गुन्ह्यांबद्दल खात्री पडणार नाही मात्र त्याच्या विरोधात सध्या इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केलेली आहे केवळ भारतालाच नव्हे तर इतर देशांमध्ये देखील तो वॉन्टेड असल्याकारणाने ही कारवाई इंटरपोलने केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , योगेश कादियान असे 19 वर्षीय चोरट्याचे नाव असून लाईव्ह हिंदुस्तानने त्याच्या संदर्भात वृत्त दिलेले आहे . हरियाणातील झंजर जिल्ह्यातील बेरी गावचा तो मूळचा रहिवासी असून इंटरपोलच्या वेबसाईटवर त्याची माहिती उघड करण्यात आलेली आहे. त्याच्या डाव्या हातावर एक तीळ असून इतक्या कमी वयात त्याने अत्यंत गंभीर गुन्हे केलेले आहेत.

काही वर्षांपूर्वी एनआयएने भारतातल्या गॅंगस्टर टोळीवर कारवाई केलेली होती त्यावेळी योगेश कादियान हा बनावट पासपोर्ट काढून अमेरिकेत दाखल झाला . त्याच्यावर हत्येचा प्रयत्न , गुन्हेगारांना साथ देणे , बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे अनेक गुन्हे दाखल असून इतक्या लहान वयात तो अत्याधुनिक हत्यारे चालवण्यात देखील मास्टर आहे असा दावा इंटरपोल कडून करण्यात येत आहे.

पंजाबमधील कुख्यात असलेल्या बंबीहा गॅंग सोबत देखील त्याचे संबंध असल्याची चर्चा असून नीरज पवाना नावाच्या दिल्लीतील एका डॉन सोबत देखील त्याची ऊठबस आहे . पंजाबपासून हरियाणापर्यंत बंबीहा गॅंग आणि गोल्डी ब्रार यांच्यात वाद सुरू असून शाळकरी वयातच त्याच्या विरोधात इंटरपोलने नोटीस जारी केल्यानंतर तो चर्चेत आलेला आहे.


शेअर करा