निम्मा पगार देतो पण ‘ माय लॉर्ड युवर लॉर्डशिप ‘ म्हणू नका

शेअर करा

आतापर्यंत अनेक चित्रपटात आपण न्यायाधीशांचा उल्लेख वकील ‘ माय लॉर्ड युवर लॉर्डशिप ‘ असा केल्याचे पाहिलेले असेल मात्र सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तींनी याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत तुम्ही मला माय लॉर्ड म्हणणे थांबवले तर तुम्हाला मी माझा निम्मा पगार देतो अशी उपरोधिक टिप्पणी केलेली आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंह यांनी असे म्हटलेले आहे.

एका खटल्याच्या नियमित सुनावणीच्या वेळी युक्तिवाद करणारे वकील वारंवार न्यायाधीश यांच्याकडे पाहून ‘ माय लॉर्ड युवर लॉर्डशिप ‘ असे म्हणत होते त्यावर नरसिंह यांनी किती वेळा ‘ माय लॉर्ड युवर लॉर्डशिप ‘ म्हणणार आहात. तुम्ही हे म्हणणे थांबवले तर मी तुम्हाला अर्धा पगार देईल असे देखील ते म्हणाले.

न्यायमूर्ती म्हणाले की ‘ माय लॉर्ड युवर लॉर्डशिप ‘ ऐवजी तुम्ही सर का म्हणत नाही. तुम्ही उच्चारलेले दोन्ही शब्द हे ब्रिटिशकालीन वसाहतवादी मानसिकता दर्शवत असल्याने न्यायमूर्तींसाठी या शब्दाचा वापर करू नये असा ठराव बार कौन्सिल ऑफ इंडियाने 2006 साली केलेला आहे मात्र अद्यापही वकील या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत असे देखील म्हटलेले आहे .


शेअर करा