‘ लेकीन आपुन रुकेगा नही ‘, पोस्टर फाडल्यावर उत्कर्षाताई रुपवते यांनी ठणकावलं 

शेअर करा

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांचे पोस्टर फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर रूपवते यांनी प्रतिस्पर्धी भिरभिरलेले आहेत त्यामुळे माझे पोस्टर फाडत आहेत असे म्हटलेले आहे. 

उत्कर्षाताई रुपवते  म्हणाल्या की , ‘ माझे प्रतिस्पर्धी भिरभिरले आहेत.त्यांच्याकडे अमाप पैसा आणि सत्ता आहे मात्र जनतेचा पाठींबा नाही.माझ्याकडे फक्त जनतेचा पाठींबा आहे. माझे प्रतिस्पर्धी समोर येऊन मला थांबवू शकत नाहीत म्हणून ते कधी रात्री माझ्या चालत्या गाडीवर  दगडफेक करतात तर कधी माझे पोस्टर फाडून टाकतात.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील दोन्ही आजी-माजी उमेदवारांवर टीका करत चर्चेसाठी समोर येण्याचे आव्हान रूपवते यांनी दोघांनाही दिलेले आहे. दोन्ही आजी-माजी खासदारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी कुठलेही काम केले नाही केवळ नागरिकांची दिशाभूल केलेली आहे असा आरोप रूपवते यांनी केला होता त्यानंतर समोरासमोर चर्चेसाठी येण्याचे देखील आव्हान दिले होते त्यानंतर त्यांच्या गाडीवर आधी दगडफेक झाली त्यानंतर पोस्टर फाडण्याचा प्रकार घडला. 

उत्कर्षाताई रुपवते यांनी मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतलेली असून ‘ त्यांना लवकर बरे व्हा तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे. मराठा आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी मी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात आंदोलनकर्त्या तरुणांना भेटले होते त्यावेळी युवावर्गात आणि एकूणच समाजामध्ये जरांगे पाटील दादांबद्दल असलेल्या अफाट श्रद्धेची भावना मी जवळून अनुभवली आहे.दादा लवकर बरे व्हा, तुमच्या मार्गदर्शनाची आम्हांला गरज आहे.-उत्कर्षा प्रेमानंद रूपवते ‘, असे म्हटलेले होते . शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या उत्कर्षाताई रुपवते यांना ‘ प्रेशर कुकर ‘ चिन्ह देण्यात आलेलं आहे . 

माजी मंत्री दादासाहेब रुपवते , प्रेमानंद रूपवते, माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या कार्याचा आदर्श घेऊन रुपवते या राजकारणात सक्रिय असून राज्य महिला आयोगाच्या त्या सदस्या देखील राहिलेल्या आहेत. अनेक पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केलेले असून शिर्डी मतदारसंघात महिला मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे. दुसरीकडे सद्य परिस्थितीत मतदारमहायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांवर मतदार नाराज असले तरी उत्कर्षाताई रुपवते यांच्यासाठी ही लढाई जिकिरीची ठरणार आहे


शेअर करा