‘ ह्या ‘ तारखेपासून पुण्यात कडक लॉकडाऊन.. निर्बंध पाळले जात नसल्यामुळं सरकारचा निर्णय

शेअर करा

कोरोनाने बहुतांश दाट लोकवस्ती असलेली शहरे टार्गेट केलेले असल्याने पुण्यात कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. तातडीचा उपाय म्हणून पुणे व पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील प्रतिबंधित विभागात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. येत्या १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

पुण्यात लॉकडाऊन नेमका कुठे आणि कशा स्वरूपात असेल ?

  • पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र, दोन्ही शहरांच्या पोलीस आयुक्तांलयांच्या हद्दीत, हवेली तालुका आणि कँटोन्मेंट परिसरात लॉकडाऊनचे निर्बंध असतील
  • लॉकडाऊनचा कालावधी १३ जुलै ते २३ जुलैपर्यंत असेल
  • १३ जुलै ते १८ जुलै हे सुरुवातीचे दिवस कडक लॉकडाऊन राहील. दूध, मेडिकल व अत्यावश्यक सेवा वगळता इतर काहीही चालू राहणार नाही.
  • १९ जुलैनंतर पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल
  • अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त व अधीक्षक कार्यालयातून ऑनलाइन पास मिळेल
  • शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसांत नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करावी. धान्य व भाजीपाला घेऊन ठेवावा.
  • शासकीय कार्यालयात किती कर्मचारी उपस्थित राहतील, याबाबतचे आदेश लवकरच काढले जातील

लॉकडाऊनच्या ह्या निर्णयाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, “अनेक लोक लॉकडाऊन गांभीर्यानं पाळत नाहीत. विनाकारण आणि विनामास्क बाहेर पडत आहेत. त्यातून संसर्ग वाढतो आहे. करोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. काही पुणेकरांना हा निर्णय अडचणीचा वाटू शकतो. पण त्याला पर्याय नाही,इंग्लंडनंही मधल्या काळात लॉकडाऊन उठवला होता. त्यांनाही नंतर पुन्हा लावावा लागला. निर्बंध पाळले जात नसल्यामुळं असे निर्णय घ्यावे लागतात “

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात करोनाची लागण पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पुरता मर्यादित होती. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ग्रामीण भागातही लागण सुरू झाली.पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३५ हजारच्या उंबरठ्यावर आहे. आतापर्यंत ३४ हजार ५८२ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर ९७९ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील रुग्णसंख्येनं १५ हजारचा टप्पा ओलांडला असून रोज त्यात नवीन रुग्णांची भर पडते आहे .


शेअर करा