शेतकऱ्यांचा आज देशभरात रेल रोको , सरकारची पळापळ अन लखनऊमध्ये ‘ मोठा निर्णय ‘

शेअर करा

संयुक्त किसान मोर्चाकडून देशभरात घोषित करण्यात आलेल्या रेल रोको आंदोलनाला आज सकाळी १०.०० वाजल्यापासून सुरूवात झालेली आहे . आज सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत शेतकरी आंदोलकांचं हे विरोध प्रदर्शन सुरू राहणार आहे. लखीमपूर खीरीमध्ये घडलेली हिंसक घटना विस्मरणात जाऊ शकत नाही. अद्यापदेखील आरोपींविरोधात कारवाई न झाल्यानं आज शेतकऱ्यांनी सहा तासांचा रेल्वे बंद पुकारला आहे. यात वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होतील, असं ट्विट किसान एकता मोर्चानं केलंय.

शेतकऱ्यांच्या या आवाहनानंतर सरकारची चांगलीच पळापळ झालेली पहायला मिळत असून रेल रोकोच्या पार्श्वभूमीवर लखनऊ जिल्ह्यात कलम १४४ ची घोषणा पोलिसांनी केली आहे. रेल रोकोमध्ये सहभागी होणाऱ्यांविरोधात पोलीस कारवाई करतील आणि कुणीही सामान्य परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असंही लखनऊ पोलिसांनी म्हटल आहे.

तीन कृषी कायद्यांच्या विरोधार्थ सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलना दरम्यान घडलेल्या लखीमपूर हिंसाचार प्रकरणान मोठा धक्का बसला . केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने चक्क शेतकऱ्यांवर गाडी चढवली त्यामुळे अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा याकरता आजचे आंदोलन सुरु आहे . अद्यापही सरकार हातावर हात ठेवून बसल्याने सरकारविरोधात संताप वक्त केला जात आहे. अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा हा लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी आहे.शेतकरी आंदोलनाच्या आडून काही असामाजिक तत्त्वांकडून कारवायांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे .


शेअर करा