.. अखेर करुणा मुंढे यांच्याकडून नवीन पक्षाची घोषणा , धनंजय मुंढेंना पक्षात प्रवेश देणार नाही

शेअर करा

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वरील आरोपामुळे चर्चेत आलेल्या त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी नगर येथे गुरुवारी आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ‘ शिव शक्ती सेना ‘ असे त्यांच्या पक्षाचे नाव असून अनेक मंत्र्यांच्या पत्नी देखील माझ्याशी संपर्क केला असून त्यांनी माझ्या पक्ष स्थापनेला पाठिंबा दिला आहे, असा दावा देखील करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

नगर येथे गुरुवारी करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली त्या वेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘ नगरमध्ये 30 जानेवारीला मोठा मेळावा घेऊन मी पक्षाच्या कामकाजाची सुरुवात करणार आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणे, गोरगरिबांवर अन्याय दूर करणे या उद्देशाने ही पक्षाची स्थापना मी करणार असून या आधी देखील मला अनेक पक्षात बोलावणे आले होते. ‘

आमच्या नवीन पक्षात सर्वसामान्य जनतेला स्थान असेल. वेळ पडली तर आपण बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या विधानसभा मतदारसंघातून माझे पती धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील निवडणूक लढण्यास मागेपुढे पाहणार नाही. मी माझे जीवन जनसेवेसाठी देण्याचा निर्णय घेतला असून माझा पक्ष हा चांगल्या लोकांचा पक्ष असेल त्यामध्ये माझ्या पतिला सुद्धा मी स्थान देणार नाही. ‘ कार्यकर्ते आगे बढो करुणा मुंडे उनके साथ है ‘ असेच माझ्या पक्षाचे धोरण राहील .

मी हा पक्ष जनतेकडून देणगी गोळा करून सुरू करणार आहे. माझ्या पक्षात समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थान राहील. समाजकारण करत असताना मला सत्तेत असणे गरजेचे वाटते. घरात आपण राजकारण पाहिले आहे. पोलिसांचा कसा वापर होतो हे देखील आपण पाहिले आहे. सध्या तीन पक्षांचे सरकार असून पोलिसांना फक्त राजकीय बळी दिले जात आहे आणि मंत्र्यांच्या या कृतीची फळ परमविर सिंह समीर वानखेडे यांच्यासारख्यांना भोगावी लागत आहेत.’,
असेदेखील त्या पुढे म्हणाल्या आहेत.


शेअर करा