बीड हादरले..लग्नाच्या आदल्या दिवशी बाजारात त्याच्यासोबत ‘ ती ‘ दिसली अन ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून कुटुंबियांच्या संमतीने होऊ घातलेल्या आंतरजातीय विवाहाच्या पूर्वसंध्येला सख्ख्या बहिणीसह तिच्या नियोजित वरावर भावाने चाकूने हल्ला केल्याची घटना बीड शहर पोलीस ठाण्यापासून अगदी जवळ असलेल्या रस्त्यावर सत्तावीस तारखेला रात्री साडेआठ वाजता घडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, धनंजय दीपक बनसोडे ( राहणार शाहूनगर बीड ) असे हल्लेखोराचे नाव असून गुन्हा घडल्यानंतर तो फरार झाला आहे. त्याची बहीण रुपाली ( वय 25 ) हिचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता मात्र तिच्या पतीचे आजारपणामुळे निधन झाले. तिला एक मुलगाही आहे त्यामुळे पुढे आयुष्य कसे काढायचे अशी चिंता असताना तिचा विवाह कुटुंबियांच्या संमतीने योगेश विनायक बागडे ( वय 29 सराफा लाईन बीड ) याच्याशी 28 फेब्रुवारी रोजी ठरवला होता. नोंदणी पद्धतीने विवाह होणार होता. योगेश याचे देखील पूर्वी लग्न झालेले आहे मात्र काही कारणांवरून पत्नीशी त्याने फारकत घेतलेली आहे.

दोन्ही कुटुंबीयांकडून विवाहाला संमती होती मात्र रूपाली हिचा भाऊ धनंजय याचा मात्र या विवाहाला विरोध होता. दुसऱ्या दिवशी नोंदणी पद्धतीने विवाह असल्याने ते रूपाली आणि योगेश हे बाजारात खरेदी करत असताना रूपालीचा भाऊ धनंजय हा तेथे आला आणि त्याने दोघंही जणांवर चाकूने सपासप वार केले आणि तिथून पलायन केले.

परिसरातील नागरिकांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक रवी सानप , सहाय्यक निरीक्षक महादेव ढाकणे, हवालदार महेश जोगदंड यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे जबाब नोंदविल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.


शेअर करा