मार्केट यार्डमध्ये गाडी लावून पुन्हा आले तर चक्क , व्यावसायिकाला ‘ असाही ‘ अनुभव

नगर शहरात एक खळबळजनक घटना घडली असून शहरातील मार्केट यार्ड चौक येथे उभ्या केलेल्या एका कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने कारमध्ये ठेवलेली सुमारे एक लाख बेचाळीस हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे. मंगळवारी दोन तारखेला हा प्रकार दुपारी घडलेला असून कार चालक संजय यशवंत वाघ ( राहणार गजानन नगर नेप्ती रोड ) यांनी या प्रकरणात कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संजय वाघ हे व्यावसायिक कामानिमित्त मार्केट यार्ड परिसरात आले होते त्यावेळी त्यांनी चौकातील एका ऑटोमोबाइल दुकानासमोर गाडी उभी केली आणि कामानिमित्त दुकानात गेले होते याच वेळी एका चोरट्याने त्यांच्या कारची काच फोडली आणि कारमधील एक लाख 42 हजार रुपये आणि इतर काही कागदपत्रे असलेली बॅग लंपास केली. संजय वाघ हे परत आले त्यावेळी त्यांना हा प्रकार लक्षात आला. कारमध्ये त्यांनी पाहिले असता कारमधील रक्कमही लंपास झाली होती आणि सोबतची कागदपत्रे देखील गायब होती, हे लक्षात आल्यावर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदवली आहे.