
पुण्यातील पूजा राठोड आत्महत्या प्रकरणात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते त्यानंतर अवघ्या काही दिवसात संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करून जाहीर केलेले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथमच सरकारमधील एखाद्या मंत्र्याला कोरोना लागण होण्याची ही वेळ आहे. मुंबईतील एका रुग्णालयात संजय राठोड यांनी कोरोना चाचणी केली होती त्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. संजय राठोड यांनी ट्विट करून मला लक्षणे नसल्यामुळे घरी क्वारंटाईन होण्यास सांगितलेले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना काही त्रास किंवा लक्षणे असतील तर त्यांनी चाचणी करून घ्यावी, असे ट्विट केले आहे. सध्या संजय राठोड हे घरी क्वारंटाईन झालेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.