कोरोनाबद्दल गैरसमज पसरवणारा ‘ हा ‘ व्हाट्सएप्प मेसेज तुम्हालाही आलाय का ? : नक्की वाचा

शेअर करा

कोरोना काळात बहुतांश लोक सोशल मीडियाचा जास्त प्रमाणात वापर करत असल्याने सोशल मीडियावर अफवांचे नवीन पेव फुटले आहे. कोरोना काळात काळजी घेण्यासंदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या नावाने पुन्हा एक बनावट मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात कोरोनाविषयी भीती आणि अत्यंत गैरसमज पसरवणारी माहिती आहे त्यामुळे अशा बनावट मेसेज मधील आव्हानांना आवाहनाला बळी पडू नये असे आवाहन नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

” कलेक्टरकडून सूचना ” अशा आशयाचा संदेश जिल्हा माहिती कार्यालयांच्या नावाने नाशिक सहविभागातील अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात व्हाट्सअप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटक लोक पसरवत आहेत. त्यात प्रामुख्याने आपल्या जीवनावश्यक वस्तू बंद करणे, त्यांच्या हाताळणी, बाळगणे आणि आणि काळजी घेण्याबरोबरच वृत्तपत्रांबाबत संभ्रम निर्माण करणारी माहिती पसरवली जात आहे.

यापूर्वी देखील अशाच प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट मेसेज व्हायरल झाल्याने यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्याचा शोध सुरू असून आत्ताही अशाच प्रकारे पुन्हा बनावट संदेश व्हायरल होत असल्याने जिल्हा प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. शासन-प्रशासन आणि जनता यांच्यात दुवा साधण्याचे काम वर्तमानपत्रे करत असून कोरोना काळात हेच खरे मित्र असल्याचे देखील प्रशासनाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे


शेअर करा