पारनेर तालुक्यात आढळला मृतदेह , सुप्यात गुन्हा दाखल

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण इथे समोर आलेले असून एका अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून एका व्यक्तीचा खून केलेला आहे . घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून शुक्रवारी 22 तारखेला ही घटना समोर आलेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, अंकुश भिमाजी कवठाळे असे मयत व्यक्ती यांचे नाव असून याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .अमोल भिमाजी कवठाळे यांनी याबद्दल फिर्याद दिलेली असून फिर्यादीमध्ये त्यांनी पारनेर फाट्यापासून राळेगणसिद्धीकडे कॅनॉलच्या पुढे असलेल्या पडीक शेतात अंकुश भिमाजी कवठाळे यांचा मृतदेह आढळून आलेला होता. तिथे जाऊन पाहिले असता डोक्यात मारहाण झाल्याने माझा भाऊ अंकुश कोठाळे हे मयत झाल्याचे दिसून आलेले आहेत त्यानंतर मी माझे चुलते आनंदा कवठाळे यांना या घटनेची माहिती दिलेली आहे, असे म्हटलेले आहे .

सुपा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. सुपा पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय तुळशीराम पवार पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.


शेअर करा