
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार श्रीरामपूर येथे समोर आलेला असून तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय वयाच्या एका विद्यार्थ्यावर दुसऱ्या एका 14 वर्षाच्या विद्यार्थ्याने घरात घुसून अनैसर्गिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे. श्रीरामपूर शहर पोलिसात या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पीडित विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याच्यासोबत शिक्षण घेत असलेला 14 वर्षीय वयाचा अल्पवयीन आरोपी घरी आला आणि त्याने आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. आपण रडायला लागल्यानंतर आरोपीने जर तू कुणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या घरच्यांना संपवून टाकू अशी देखील धमकी दिली असे त्याने म्हटलेले आहे . पीडित मुलाच्या घरचे व्यक्ती आल्यानंतर त्याने अखेर हा प्रकार सांगितला आणि प्रकरण पोलिसात पोहोचले.
पोलिसात पीडित मुलगा गेल्याचे समजताच हा अल्पवयीन आरोपी फरार झालेला असून त्याच्या विरोधात कलम 377 , 506 अंतर्गत व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहेत तर पीडित मुलावर उपचार सुरू आहेत.