सुशांत सिंहची हत्या करण्यात आली ? : ‘ ह्या ‘ दोन व्यक्तींचा धक्कादायक दावा

शेअर करा

सुशांत सिंह राजपूतचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट आला असून त्यात सुशांतच्या मृत्यू हा आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे, सुशांत सिंह वर अंत्यसंस्कार देखील करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्याबद्दलची काही कागदपत्रदेखील त्याच्या घरात पोलिसांनी आढळून आली आहेत त्यामुळे नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं असावं, असा सर्वत्र प्राथमिक अंदाज असताना बिहारमधील माजी खासदार पप्पू यादव यांनी सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात एक धक्कादायक दावा केला आहे. ‘सुशांत सिंह राजपूत हा कधीही आत्महत्या करू शकत नाही. त्याची हत्या करण्यात आली आहे’ असं पप्पू यादव यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी या घटनेची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. सुशांतच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली होती त्यानंतर संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे .

असेच आणखी एक विधान सुशांतच्या मामांनी केल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे, त्यानुसार सुशांतचे मामा म्हणाले , ” कालपर्यंत एक तरुण रिअ‍ॅलिटी शोमध्ये नाचत होता तो अचानक असा निर्णय घेईल का? नाही घेणार. रोज तो त्याच्या वडिलांशी बोलत होता, कुटुंबाशी बोलायचा. आम्हाला संशय आहे. यामध्ये काहीतरी चुकीचं असल्यासारखं आम्हाला वाटत आहे. पंतप्रधान मोदींकडे मी मागणी करतो की देशाने एक राष्ट्रवादी पुत्र गमावला आहे. तो देशासाठी आणि तुमच्या मदतीसाठीही कायम उभा राहायचा. सुशांत आत्महत्या करणं शक्य नाही. यासंदर्भात काहीतरी नक्कीच चुकीचं घडल्याची आम्हाला शंका आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास नाही . सुशांत हा अतिशय हुशार, देशाबद्दल, समाजाबद्दल प्रेम असणारा कलाकार होता. तो आत्महत्या करू शकत नाही. आम्ही सर्व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मागणी करतो की सरकारने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी”

शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. तरीही त्याच्या शरीरात काही विष होते किंवा काय यासाठी काही नमूने तपासणीसाठी जे.जे. इस्पितळात पाठवण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे .

रविवारी नेमकं काय घडलं ?

सुशांत सकाळी ६.३० वाजता उठला.त्यानंतर त्याने सकाळी ९.३० वाजता त्याने डाळिंब्याचा रस प्यायला आणि त्यानंतर स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. १०.३० वाजता स्वयंपाकी दुपारच्या जेवणात काय खाणार हे विचारण्यासाठी त्याच्या खोलीजवळ गेला. पण त्याने दरवाजा उघडला नाही.स्वयंपाकी दुसऱ्यांदा १२ वाजता त्याला हाक मारायला गेला. तेव्हाही त्याने दार उघडलं नाही. खूप वेळ दरवाजा वाजवल्यानंतरही आतून काही उत्तर न आल्यामुळे त्यांनी फोन करायला सुरुवात केली. सुशांत उत्तर देत नाही हे पाहून घरातील कर्मचारी घाबरून गेले आणि त्यांनी गोरेगाव येथील सुशांतच्या बहिणील १२.३० च्या सुमारास सुशांतच्या बहिणीला फोन केला. सुशांतची बहीण गोरेगाव येथे राहते. जवळपास ४० मिनिटांनंतर मितू सिंह त्याच्या घरी पोहोचली. तिनेही सुशांतला आवाज दिला, फोन केला. पण या सगळ्याचा काहीच उपयोग झाला नाही.जवळपास १.१५ वाजता चावीवाल्याला बोलावण्यात आलं. लॉक उघडत नसल्याचं पाहून चावीवाल्याने लॉक तोडलं, त्यावेळी सुशांतने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

सुशांतच्या मृत्यूनंतर एक धक्कादायक ट्रेंड पाहायला मिळाला. सोशल मीडियावर त्याच्या मृतदेहाचे काही फोटो हे पोस्ट करण्यात आले. मात्र त्याचे हे फोटो अपलोड करणं महागात पडू शकतं. महाराष्ट्र सायबर सेलने याचा निषेध करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. चित्रपटाच्या कलाकारांपासून ते त्यांच्या चाहत्यांपर्यंत सर्वांना सुशांतच्या मृतदेहाचे फोटो अपलोड करू नका असं सांगण्यात आलं आहे.


शेअर करा