काय बोलणार..भाजपाच्या मुख्यमंत्र्यांसाठी रशियावरुन आले नवीन हेलिकॉप्टर, तासाचे भाडे ५.१ लाख रुपये

शेअर करा

शिमला : हिमाचल प्रदेशमधील भाजपाचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर पुढील महिन्यापासून नवीन हेलिकॉप्टरमधून उड्डाण करणार आहेत. हिमाचल प्रदेश सरकारला पुढील महिन्यात हे नवीन हेलिकॉप्टर मिळणार आहे. हे हेलिकॉप्टर रशियावरुन दिल्लीत दाखल झाले आहे. याठिकाणी याची चाचणी घेण्यात येणार आहे. 

डीसीसीएने परवानगी दिल्यानंतर हे  हेलिकॉप्टर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना वापरता येणार आहे. दरम्यान, या हेलिकॉप्टरच्या उड्डाणासाठी प्रति तास ५.१ लाख रुपयांचे भाडे द्यावे लागणार आहे. यावरुन काँग्रेसने हिमालचल प्रदेश सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या हिमाचल प्रदेश सरकारजवळ भाड्याने घेतलेले एक हेलिकॉप्टर आहे. यासाठी सरकार दोन लाख रुपये प्रति तास भाडे देते. या हेलिकॉप्टरची आसन क्षमता सहा आहे. दरम्यान, स्काय वन कंपनीच्या या एमआय १७१ ए २ प्रकाराच्या नवीन हेलिकॉप्टरची आसन क्षमता २४ इतकी आहे. त्यामुळे या नवीन हेलिकॉप्टरचे भाडे जास्त आहे. 

दुसरीकडे, यावरून काँग्रेसचे हिमाचलमधील प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या कुलदीप सिंह राठोड यांनी टीका केली आहे. हिमाचल प्रदेश सरकारवर कर्जाचा डोंगर असताना दुसरीकडे मुख्यमंत्री आरामदायक हेलिकॉप्टर आणि इतर खर्च करण्यात व्यस्त आहेत. सरकारच्या या अशा वायफळ खर्चांमुळे हिमाचल प्रदेशची परिस्थिती बिकट होत चालल्याचा आरोप कुलदीप सिंह राठोड यांनी केला आहे.

नवीन हेलिकॉप्टर हे पाच वर्षांच्या कराराअंतर्गत घेण्यात येणार आहे. सरकारच्या सामान्य प्रशासन विभागने कंपनीसोबत यासंदर्भातील करार केला आहे. याआधी पवन हंस कंपनीचे हेलिकॉप्टर भाडेतत्वावर सरकारने घेतले होते. मात्र तो करार नुकताच संपुष्टात आला. डीसीसीएकडून या हेलिकॉप्टरच्या वापराला हिरवा कंदील देण्यात आल्यानंतर हे हेलिकॉप्टर मुख्यमंत्र्यांच्या सवेत रुजू होईल. या हेलिकॉप्टरचा वापर मुख्यमंत्री आपल्या दौऱ्यांसाठी करतील. याशिवाय, बर्फाळ प्रदेशातील लोकांपर्यंत हिवाळ्यामध्ये सेवा पोहचवण्यासाठी सुद्धा या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येईल. तसेच, नैसर्गिक आपत्तीच्या काळातही याचा वापर केला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांसाठी नवीन हेलिकॉप्टर घेण्यावरून आता राज्य सरकारवर टीका होऊ लागली आहे. नवीन हेलिकॉप्टरच्या निर्णयावरून सोशल मीडियावर सवालउपस्थित केले जात आहेत. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. मात्र असे असतानाही एवढा खर्च करुन हेलिकॉप्टरची सेवा का घेण्यात आली, असा सवाल करण्यात येत आहे. दरम्यान, यापूर्वी हिमाचल प्रदेश सरकारने महागड्या गाड्याही खरेदी केल्या होत्या. त्या मुद्द्यावरुनची चांगलाच वाद निर्माण झाला होता.


शेअर करा