पुणे हादरले ..बायको गावी जाते म्हणून गेली अन दिराच्या सोबत राहू लागली

शेअर करा

पुणे शहरात रोज धक्कादायक घटना उघडकीस येत असून भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पोटात चाकू खूपसून पत्नीचा खून केल्याची घटना पुण्यात वाघोली इथे घडली आहे. पुण्यातल्या वाघोली इथल्या मॅजेस्टिक सोसायटीच्या लेबर कॅम्पमध्ये ही घटना समोर आली असून पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, अनु राजू मिर्झा (वय 28) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे तर याप्रकरणी पती राजू पुनाराम मिर्झा (वय 30) असे पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिर्झा कुटुंब मूळचे छत्तीसगढ इथलं आहे. आरोपी राजू मिर्झा, मृत अनू मिर्झा हे दोघं मोशी इथं बांधकामावर मजूर म्हणून काम करत होते. राजू हा दारू पिऊन अनुला सतत मारहाण करत असल्याने त्यांच्यात भांडणं होत असायची. दोन-तीन महिन्यांपू्र्वी अनू गावाला जाते असं म्हणत घर सोडून गेली. पण ती गावी न जाता राजूचा धाकटा भाऊ राजेश मिर्झा याच्याकडे वाघोली इथं रहायला आली त्यामुळे राजुचा संशय बळावला आणि त्याने तिचा खून करण्याचा निश्चय केला . मयत अनु हिला दोन मुले देखील असून दीर राजेश मिर्झा याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

आपली पत्नी आपल्या भावासोबत राहते हे समजताच राजुचा संताप अनावर झाला आणि तो सोमवारी पहाटे वाघोली इथल्या लेबर कॅम्पमध्ये अनुला भेटायला आला. भावाच्या घरात आपली पत्नी पाहून त्याचा तिळपापड झाला आणि त्याने मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत अनुला घराबाहेर बोलावलं. तिच्याशी वाद घालत , ‘ तु सारखी माझ्या भावासोबत बोलतेस, त्याच्यासोबतच राहतेस ‘ असा संशय मनात घेऊन त्याने प्लास्टिकच्या पिशवीत आणलेल्या चाकूने पोटात सपासप वार करून अनुचा खून केला. त्यानंतर तो तेथून पसार झाला मात्र पोलिसांनी त्याला काही वेळातच अटक केली.


शेअर करा