
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली आहे. एका ४८ वर्षीय नराधमाने चक्क अल्पवयीन मुलांना आपल्या गॅरेजमध्ये बोलावून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केलेली असून प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे समजते.
उपलब्ध माहितीनुसार , आरोपी कोथरुड इथे राहणारा असून विनायक बबन वाघ (वय ४८, रा. मानाजीनगर, नर्हे ) असे त्याचे नाव असल्याचे समजते . सदर प्रकरणी एका ३३ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली असून ही घटना नोव्हेंबर २०२१ ते १० जानेवारी २०२२ दरम्यान वारंवार घडली आहे. चक्क तीन मुलांसोबत आरोपीने हा प्रकार केला असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे .
आरोपीने फिर्यादी यांच्या १३, १० व ७ वर्षाच्या मुलांना उजवी भुसारी कॉलनी इथे असलेल्या एका गॅरेजच्या आत नेले आणि त्यांचे कपडे काढून त्याच्यासोबत हा धक्कादायक प्रकार केला. कोणाला काही सांगितले तर मारुन टाकण्याची धमकी दिली त्यामुळे मुले काही बोलली नाहीत मात्र वारंवार हा प्रकार होऊ लागल्याने शेवटी या मुलांनी घरी सांगितले असता वडिलांनी कोथरुड पोलिसात फिर्याद आली असून आरोपीस जेरबंद करण्यात आले असून तपास सुरु आहे .