कर्डिले जगताप अन कोतकरचं शक्ती प्रदर्शन नडलं, भाजपच्या नेत्याकडून निशाणा 

शेअर करा

भाजपचेच जुने दिग्गज नेते वसंत लोढा यांनी सुजय विखे यांना नगरमध्ये मिळालेले लीड हे भाजपच्या मतदारांनी दिलेले आहे त्यात आमदार संग्राम जगताप यांचा काहीही संबंध नाही असे म्हणत एकाअर्थी संग्राम जगताप शिवाजी कर्डिले आणि भानुदास कोतकर यांच्या कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शनाने सुजय विखे यांचे लीड कमी झाले असेही म्हटलेले आहे. 

वसंत लोढा यांचे काय आहे म्हणणे ? 

नगर शहरात भाजपचे पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. १९९१ साली राजाभाऊ झरकर लोकसभेला उभे होते. त्यांना मिळालेल्या एकूण मतांमध्ये नगर शहरातून २४ हजार मते मिळाली होती. विखे विरुद्ध गडाख यांच्या अटीतटीच्या निवडणुकीत ही मते मिळाली होती. खासदार दिलीप गांधींना मोठे मताधिक्य ही नगर शहरातून मिळत होते. तसे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना २०१९ च्या निवडणुकीत ५४ हजार मताधिक्य होते. त्यापेक्षा जास्त मताधिक्याची यावेळेस अपेक्षा होती. मात्र, २०२४ निवडणुकीत सहकारी पक्षांचा विचार केला तर लीड फक्त ३१ हजार मिळला. त्याला कारण नगर शहराच्या लोकप्रतिनिधी बाबत असलेली नाराजी. त्याची व त्यांच्या टोळीची असलेली दहशत अवैध धंदे, व्यवसायाची वाढलेले मोठे जाळे नगर शहरात होणारे त्यांच्या माध्यमातून जागा ताबामारी, शहरात होणारे खुणाचे सत्र, एस पी ऑफीस प्रकरण पोलिसांना हाताशी धरून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे आदी अनेक प्रकार शहरात चालू आहेत . 

आता तर सत्तेत असल्यामुळे या सर्व गोष्टींना राजाश्रय मिळाला सारखे झालेले आहे त्यामुळे नगर शहरातील व्यापारी, बाजारपेठेत व सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या बद्दल नाराजी होती. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना मत दिले तर यांची दहशत गुंडगिरी व अवैध व्यवसाय, जागा ताबामारी अजून मोठ्या प्रमाणात वाढेल या विचारातून तसेच सुजय विखे पाटील यांच्या फॉर्म भरायच्या मिरवणुकीत ज्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन झाले. कर्डिले, जगताप, कोतकर त्यांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम शहरातील लोकांवर झाला त्यामुळे लीड कमी झाला. कमी लीडमुळे विखेंचा पराभव झाला.

या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान या सर्व प्रकारची जाणीव झाली होती. त्याप्रमाणे संबंधितांना सांगितले होते की शहरात या प्रवृत्तीला फार पुढे न आणता प्रचार करावा मात्र, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. ३१ हजाराचा लीड जो आहे तो भाजपचा हा लीड आहे. कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. नगर शहरात भाजपने स्वबळावर विधानसभा निवडणूक या प्रवृत्तीच्या विरोधात लढवावी. त्याबाबत शहराची सध्याची असलेली भयानक परिस्थिती वरिष्ठांना पुराव्यासह देऊनही निवडणूक आम्ही लढून जिंकू, असा आत्मविश्वास वसंत लोढा यांनी व्यक्त केला आहे.


शेअर करा