सतीश भोसले याचं घर पाडलं , अंजली दमानिया यांच्याकडून नाराजी

शेअर करा

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच ‘खोक्या’ उर्फ गुंड सतीश भोसले याचे काही गैरप्रकार आणि पैशाचा माज दाखवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते. तो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचेही स्पष्ट झाले होते. पोलीस शोध घेत असताना अखेर खोक्याला प्रयागराजमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या.सतीश भोसलेच्या ठिकाणांवर वनविभागाने बुलडोझर चालवत कारवाई केली यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. 

पोलिसांकडून अटकेची कारवाई झाल्यानंतर वनविभागाने सतीश भोसलेल्या घरावर बुलडोजर चालवला त्यानंतर रात्री २० ते २५ जणांनी घराला आग लावल्याची घटना घडली. काही लोकांनी अचानक हल्ला केल्याचा आरोप सतीश भोसलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. सतीश भोसलेचे कुटुंबीय त्याच घरात राहत होते. यानंतर अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट केली असून, त्यात नाराजी व्यक्त करताना, हे योग्य नसल्याचे म्हटले आहे. 

अंजली दमानिया आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणतात की, सतीश भोसले चे घर जाळलं? का? खूप खूप खूप वाईट वाटलं. किती क्रूर. परिवाराची काय चूक? दुसऱ्या घरावर बुलडोझर चालवला? हे खूप खूप चुकीचं आहे. सतीशने कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या, त्यासाठी कायद्याने शिक्षा द्या पण घर का जाळलं? नाही हे योग्य नाही. Really feeling very bad, असे सांगत अंजली दमानिया यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. 


शेअर करा