50 कोटींचा कुत्रा घेतला , सोशल मीडियावरील दाव्यानंतर ईडीपर्यंत बातमी पोहोचली आणि.. 

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका अजब प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून बंगळूर येथील हे प्रकरण आहे आपण महागडे श्वान खरेदी केलेले आहेत असा दावा करणाऱ्या कर्नाटक येथील एका श्वानप्रेमी व्यक्तीच्या घरी जाऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार सतीश असे या कारवाई झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने सोशल मीडियावर जगातील सगळ्यात महागडा कुत्रा आपण 50 कोटी रुपयांना खरेदी केलेला आहे असा दावा केलेला होता. त्याच्या या दाव्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा झाली आणि ही चर्चा अखेर ईडीपर्यंत पोहोचली. 

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश याच्या निवासस्थानी छापा घातला आणि कागदपत्रांची पडताळणी केली त्यावेळी सतीश यांच्या दाव्यात कुठलेही तथ्य आढळून आले नाही यापूर्वी देखील सतीश याने आपण 49 कोटी रुपयांना लांडगा खरेदी केलेला आहे असा दावा केलेला होता. दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्यानंतर मात्र ईडीचे पथक त्यांच्या दारात जाऊन धडकले होते. 


शेअर करा