पालकांच्या इच्छेच्या विरुद्ध लग्न करणारे जोडपे हक्क म्हणून पोलीस संरक्षणाची मागणी करू शकत नाहीत असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. न्यायाधीश सौरभ चौधरी यांनी एका याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय नोंदवला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , श्रेया केशर वाणी आणि त्यांच्या पतीने पालकांच्या इच्छेविरुद्ध विवाह केला आणि त्यानंतर जीविताला धोका असल्याचा दावा करत रिट याचिका दाखल केलेली होती. याचिका कर्त्या दांपत्याच्या जीविताला कुठलाही धोका नसल्याचे देखील निरीक्षण न्यायालयाने नोंदवत केवळ खरा आणि गंभीर धोका असल्यास पोलीस संरक्षण देऊ शकतात अन्यथा अशा जोडप्यांनी समाजाचा सामना करायला हवा असे मत नोंदवले आहे .