..अन म्हणून तो सातत्याने लग्नाला नकार देत होता , धक्कादायक माहिती ऐकून पोलिसही हादरले

शेअर करा

मुंबईच्या माहिम पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीने खोटे बोलून 26 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि लग्नाचं आमिष दाखवलं पण आरोपीचं आधीच लग्न झालेलं होतं. ही बाबत तरुणीला माहिती पडली तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने आरोपीला विरोध केला तेव्हा त्याने अश्लील व्हिडीओ बनवला आणि संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दाखवत 12 तोळे सोने आणि पैसे उकळले. तो तरुणीला वारंवार त्रास देऊन पैशांची मागणी करत होता. अखेर त्याच्या जाचाला कंटाळून तरुणीने माहिम पोलीस ठाण्यात धाव घेतली.

उपलब्ध माहितीनुसार, आरोपीचं नाव अब्दुल सुफियान हिफजूर (वय 30) असं आहे. पीडितेने आरोपी विरोधात फसवणूक, धमकी आणि बलात्काराची तक्रार केली आहे.पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 376 (2) (N) आणि 384 अंतर्गत गुन्हा दाखल करत मुंबईच्या धारावी येथून बेड्या ठोकल्या आहेत . पोलिसांनी आरोपीला कोर्टात सादर केलं असता त्याला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख काही महिन्यांपूर्वी एका जिममध्ये झाली होती. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये संबंध वाढत गेले. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले मात्र लग्नाची वेळ आली कि टाळत असे यानंतर मात्र पीडितेने आरोपीबाबत अधिक चौकशी केली असता आरोपीचं आधीच लग्न झाल्याची माहिती तिला समजली.

पीडित तरुणीने विरोध केला तेव्हा आरोपीने तिचे अश्लील आपत्तीजनक व्हिडीओ बनवले. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पीडितेकडून 12 तोळे सोने आणि पैसे उकळले. त्यानंतर तो वारंवार पीडितेकडून पैसे उकळू लागला. अखेर पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीला धारावी येथून अटक केली. आरोपीने आणखी कोणत्या मुलीला फसवून लुबाडलं आहे का? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.


शेअर करा