धक्कादायक..मुंढव्यातील तरुणीच्या घरात तब्बल ‘ इतके ‘ दिवस मुक्काम अन आता म्हणतोय की..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरातील रहिवासी असणाऱ्या एका तरुणीवर तिच्याच एका मित्राने लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी बलात्कार केला. सदर तरुणाने हा प्रकार गुंगीचे औषध देऊन केला असल्याचे पीडित तरुणीचे म्हणणे आहे. जेव्हा पहिल्यांदा बलात्कार झाला तेव्हा त्याने तडजोड करून प्रकरण मिटवले मात्र पुढे पीडित तरुणी गर्भवती राहिली तेव्हा त्याने लग्नास नकार दिला.

उपलब्ध माहितीनुसार, नदीम बाबू शेख असं गुन्हा दाखल झालेल्या 32 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव असून आरोपी नदीम हा मुंबईतील रहिवासी असून एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. पीडित तरुणी आणि आरोपी हे मित्र असून गेल्या काही काळापासून ते एकमेकांना ओळखत होते तर 27 वर्षीय पीडित तरुणी इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होती मात्र लॉकडाऊननंतर काम मिळत नसल्याने तरुणी घरीच राहत होती.

पीडित तरुणी घरीच असल्याची संधी साधत सप्टेंबर महिन्यात आरोपी नदीम हा पीडित तरुणीच्या घरी आला आणि त्याने पीडितेला गुंगीचं औषध दिल्याने ती बेशुद्ध झाली. हीच संधी साधत आरोपीनं बेशुद्धावस्थेतच पीडितेवर बलात्कार केला . पीडित तरुणीला शुद्ध आली तेव्हा त्याला जाब विचारला असताना आपण लग्न करूयात म्हणून प्रकरण मिटवले मात्र त्यानंतर तो पुन्हा10 ऑक्टोबर रोजी आरोपी पुन्हा पीडितेच्या घरी आला आणि तिच्याच घरी पाच दिवस राहत त्याने 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान तिच्यासोबत वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केले.

सतत सहा दिवस हा प्रकार सुरु राहिल्याने पीडिता हा गर्भवती झाली आणि नदीम याला हे समजताच त्याने लग्नाला नकार दिला आणि टाळाटाळ करायला सुरुवात केली. तरुणीला शिवीगाळ करत त्याने लग्न करण्यास नकार दिला . पीडित तरुणीने त्याची वारंवार समजूत घातली मात्र तो ऐकत नसल्याचे पाहून पीडित तरुणीनं थेट मुंढवा पोलीस ठाण्यात जात आरोपी नदीम शेख याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे


शेअर करा