
मनोहर भिडे सातत्याने वाटेल ते बरळतात . इतिहासाची तोडफोड करत दोन समाजात तेढ निर्माण करतात. युवकांची माथी भडकवून अराजकता निर्माण करतात मात्र सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. त्यांना पूर्णपणे मुभा देते त्यामुळे मनोहर भिडे यांचा बोलविता धनी कोण आहे ? त्यांना अभय कुणाचे आहे ? असा खडा सवाल एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलेला आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या की , ‘ मनोहर भिडे यांनी आतापर्यंत अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही मनोहर भिडे यांनी महात्मा गांधीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले सातत्याने ते अशा पद्धतीची वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि विष कालवण्याचा प्रकार करत आहेत . राज्याचे गृहमंत्री त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाहीत याचा अर्थ काय काढायचा ? असे म्हणत यापुढे जर मनोहर भिडे यांनी असे वक्तव्य केले तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असे देखील त्यांनी म्हटले आहे.