
सोशल मीडियाच्या माध्यमातून चमकोगिरी करणाऱ्यांची नगर जिल्ह्यात काही कमी राहिलेली नाही मात्र असाच प्रकार करणे एका तरुणाला चांगलेच अंगलट आलेले असून हातात गावठी कट्टा घेऊन फिल्मी स्टाईल सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केलेली आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मिलिंद मरकड ( वय 19 तालुका नेवासा ) असे या तरुणाचे नाव असून सोशल मीडियावर हातात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या या तरुणाचा रिल्स चांगलाच व्हायरल झालेला होता. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली त्यावेळी आरोपी नेवासा तालुक्यातील मांडे मोरेगव्हाण शिवारात कट्टा विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती हाती लागली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यानंतर मंदिर परिसरात सापळा रचला आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र कर्डिले , ज्ञानेश्वर शिंदे , गणेश भिंगारदे , रंजीत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.