मॅडम तुमच्या शरीरातील भूत खूपच ‘ पॉवरफुल ‘, आता एकच पर्याय म्हणत चक्क..

शेअर करा

देशात एक धक्कादायक प्रकरण उघडकीला आले असून एका महिलेवर भूत उतरवण्याच्या नावाखाली तब्बल एक वर्षापर्यंत अत्याचार करण्यात आलेले आहेत. मध्यप्रदेशातील हे प्रकरण असून खंडवा जिल्ह्यातील ही घटना आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला ही चक्क शिक्षिका असून तिचा अंधश्रद्धेवर विश्वास असल्याने तिने एका मांत्रिकाला हाताशी धरलेले होते. आपल्या शरीरात भूत आहे असे या महिलेचे म्हणणे होते त्यानंतर या मांत्रिकाने त्याचा फायदा घेत शरीर शुद्ध कराव लागेल.. माझ्याशी शारीरिक संबंध ठेवून मंत्र म्हणावे लागतात, असे देखील तो म्हणाला आणि त्याला ही महिला बळी पडली.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित शिक्षिकेचे वय तीस वर्ष असून 2019 पासून त्वचेच्या संबंधात आजाराने त्रस्त झाली होती. डॉक्टरांच्या औषधाचा काही उपयोग होत नसल्याने तिने मांत्रिकाचा आधार घेतला त्यावेळी मांत्रिकाने तुमच्या शरीरात भूत आहे. माझ्या शरीरातील दैवी शक्ती ते पळवून लावतील मात्र त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील असे सांगितले. शशिकांत सामरे असे या बाबाचे नाव असून तो प्लंबर काम करतो.

शशिकांत याच्या घरी पोहोचल्यानंतर शिक्षिका असलेल्या या महिलेला आरोपीने तुझ्या अंगामध्ये भूत आहे. त्याला पळवून लावावे लागेल त्यासाठी तुझ्या घरी पूजा करावी लागेल असे सांगत तिच्याकडून पैसे घेतले आणि एका घाटावर पूजा देखील बांधली. शिक्षिकेच्या अंगात असलेले भूत जात नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने भूत जास्त पावरफूल आहे त्यासाठी तुला माझ्या अंगात असलेल्या दैवी शक्ती देतो मात्र तुला माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील असे म्हणत शिक्षिकेसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले आणि तिच्याकडून चार लाख रुपये देखील हडप केले.

तब्बल एक वर्ष अत्याचार केल्यानंतर महिलेच्या आजारात कुठलीच सुधारणा झाली नाही त्यावेळी तिला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली तसेच आरोपीने आपल्याकडून तब्बल चार लाख रुपये देखील उकळले मात्र त्याचा आपल्याला काहीच फायदा झालेला नाही हे देखील तिच्या लक्षात आले. यासंदर्भात तिने त्याला जाब विचारला त्यावेळी त्याने तिला धमक्या दिल्या असेदेखील तिचे म्हणणे असून तिने पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्याच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.


शेअर करा