
मोठी वहिनी ही आईसमान असते मात्र कलियुगात अनेक जणांना याचा विसर पडलेला असून ही दुर्दैवी गोष्ट आहे. उत्तर प्रदेशातील बेटीया इथे एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून मोठ्या वहिणीच्या प्रेमात पडल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना रंगेहात धरले आणि त्यानंतर ग्रामपंचायतीच्या शिवमंदिरात यांचे लग्न देखील लावून देण्यात आले. दिर आणि वहिनी यांचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते अशीही माहिती समोर आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, माझोलिया जिल्ह्यातील गुरुचूरवा गावात हा प्रकार समोर आला असून वहिनीला सध्या दीड वर्षांचा मुलगा असून ती आता दुसऱ्यांदा गर्भवती आहे . धक्कादायक म्हणजे लग्नाच्या वेळी या वधूचा पहिला पति देखील उपस्थित होता. चार वर्षांपूर्वी नरिंदर पंडित यांच्या मोठ्या मुलाचा विवाह पूनिता कुमारी नावाच्या एका तरुणीसोबत झालेला होता. लग्नानंतर सासरी आल्यानंतर ती तिच्या दिराच्या प्रेमात पडली त्यानंतर त्यांनी नेहमी भेटण्यासाठी म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाची निवड केली आणि तिथे ते दोघे गावकऱ्यांना आढळून आले.
सदर प्रकरणाची पतीला कल्पना होतीच अन त्यांच्यात यावरून वाद देखील झाले होते. रंगेहात धरल्यानंतर या पतीला देखील बोलावून घेण्यात आले त्यावेळी त्याने पत्नीला जाब विचारला आणि तिने आपल्याला दिरासोबतच लग्न करायचे आहे असे सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी या महिलेचे लग्न दिरासोबत लावून दिले. पुनीता कुमारी हिने यावेळी बोलताना आमच्या मध्ये चार वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. सध्याची दीड वर्षाची मुलगी आणि पोटातील बाळ हे देखील आपला दीर असलेला राकेश याचेच आहे असेही तिने सांगितले . त्यांचा विवाह लावून देण्यात आला आणि मोठ्या भावासाठी दुसरे स्थळ शोधण्यास गावकऱ्यांनी देखील सुरुवात केलेली आहे.