श्रीगोंदा हादरलं..मध्यरात्री घरात घुसून केली एकाची हत्या

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ इथे काही अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री घरात घुसून एका व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या केलेली आहे . चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , पारनेर तालुक्यातील सुप्याजवळील हंगा येथील योगेश सुभाष शेळके ( वय 33 ) यांनी 18 एकर क्षेत्र पाच वर्षांपूर्वी विकत घेतलेले होते. शेती करण्यासाठी वडील पत्नी व कुटुंबियांसोबत ते कोथूळ येथे राहायला आले. 29 जानेवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास कुणीतरी दरवाजा वाजवला म्हणून त्यांची पत्नी आरती यांनी दरवाजा उघडला त्यावेळी चार सडपातळ काळे कपडे घातलेले इसम आतमध्ये कोयता घेऊन घुसले . 

आरती आरडाओरडा करायला लागल्यावर आरोपींनी त्यांना तू काही बोलली तर तुला मारून टाकीन असे म्हणत दम दिला आणि त्यानंतर योगेश सुभाष शेळके यांच्याकडे जाऊन धारदार शास्त्राने त्यांचा खून केला आणि त्यानंतर आरोपींनी तेथून पलायन केले . आरती यांनी त्यानंतर या प्रकरणी तात्काळ पोलिसांना खबर दिली. 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी योगेश रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. ठसे तज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आलेले असून इतर व्यक्ती देखील घरात असताना एकाच व्यक्तीवर हल्ला करून का ठार केले यामुळे या हत्येचे गूढ वाढलेले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे. 


शेअर करा