आता आपल्याला कळलेच असेल की राहुल सोलापूरकर जे बोलतो ते कुणाच्या इशाऱ्यावर , ‘ त्या ‘ ट्विटची चर्चा सुरु 

शेअर करा

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्या विरुद्ध कोल्हापूर पाठोपाठ नागपूर पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलतरोडी पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम १५१, १९६, २९९, ३०२, ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे . 

दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर याच्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलेले असून त्यामध्ये महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर याची पुणे सांस्कृतीक धोरण समितीच्या सल्लागार पदासाठी नेमणुक करण्यात आली, ‘ असे म्हटलेले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये ,’ “पुण्याचे सांस्कृतिक धोरण आणि अंमलबजावणी यासाठी एक समिती निर्माण करण्यात आली. या समितीमध्ये ‘थोर’ इतिहास संशोधक राहुल सोलापूरकर यांना संधी देण्यात आली. आता आपल्याला कळलेच असेल की, सोलापूरकर जे बोलतो ते कुणाच्या इशाऱ्यावर बोलतो आणि त्याला राजाश्रय कुणाचा आहे”, असा प्रश्न विचारला आहे. 

राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेच्या घटनेवर भाष्य करताना शिवाजी महाराजांनी आग्र्यातून सुटका करुन घेण्यासाठी तिथल्या सैनिकांना लाच दिल्याचं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. सातत्याने महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रकार काही ठराविक व्यक्तींकडून केला जात असल्याची सोशल मीडियात चर्चा आहे. 


शेअर करा