बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिलेले आहे .
प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराडचा उल्लेख करण्यात आला आहे तर आरोपी क्रमांक दोन म्हणून विष्णू चाटेचा उल्लेख आहे. या प्रकरणात ॲट्रॉसिटी, खंडणी आणि हत्या या तिन्ही घटनांचा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. सीआयडी याचा तपास करत असताना सीआयडी ते लक्षात आलं की, हे तिने गुन्हे वेगळे नसून एकत्रितच आहेत त्यामुळे तिन्ही गुन्हे एकत्रित करून आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे आणि खंडणीतून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हटले आहे की, सहा तारखेला संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांच्यात आवादा कंपनीच्या प्रांगणात वाद झाला होता आणि या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता तर सात तारखेला सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला होता. त्यावेळी वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला सांगितले की, जो उठेल आणि आपल्या आड येईल त्याला कोणालाही सोडायचं नाही यानंतर सुदर्शन घुलेने आवादा कंपनीत फोन करून धमकी दिली.
आठ तारखेला विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि एक गोपनीय साक्षीदार त्यांच्या सोबत असताना विष्णू चाटेने सुदर्शन घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिला होता. संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, असा धक्कादायक उल्लेख करण्यात आला आहे. नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेल इथे ही भेट झाली होती. आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर त्याचे काय परिणाम होतात हा संदेश इतरांना द्या, असाही उल्लेख आरोप पत्रात नमूद करण्यात आला आहे.